जिल्हा परिषद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2019 कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश
अकोला,दि.13 (जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2019
साठी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असून घोषीत केल्याच्या
दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जिल्हा
परिषद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2019 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत,
निर्भय व न्यायवातावरणात पार पाडण्याच्या इष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहिता
1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत सार्वत्रिक
निवडणूक 2019 निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यत
शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे आणि जो कोणी या
नियमांचे उल्लंघन करील तो इसम त्या शस्त्र परवानाधारक दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरेल.ज्या
ठिकाणी मतदान होणार आहे. त्या मतदान केंद्राच्या ठिकाणपासून 200 मीटर परिसरात सर्व
पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, पानीक्षेपक, सर्व प्रकारचे
फेरीवाले व इतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन,संबंधीत
पक्षाच चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध
करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी निवडणूक साहित्य कक्ष (STRONG ROOMDआहेत,तसेच जिल्हयातील
मतदान केंद्रावर आणि ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक
आदेश लागू राहतील. असे जिल्हादंडाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी कळविले आहे.
00000
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा