प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: लाभार्थ्यांच्या नावातील त्रुटी दुरुस्तीचे आवाहन; शेतकरी स्वतः करु शकता दुरुस्ती


   अकोला,दि.११ (जिमाका)-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन टप्प्यातील मदतीचे वितरण नोव्हेंबरपासून त्यांच्या आधारकार्ड संबंधी माहितीद्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांचे योजनेसाठी देण्यात आलेले नाव आणि त्यांच्या आधार कार्डवरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८३ हजार २११ शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि योजनेसाठी दिलेले नाव यामध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नावातील त्रुट्यांची दुरुस्ती कराव्या असे आवाहन करण्यात आले आहे. स्वतःच्या ॲण्ड्रॉईड फ़ोन वरुनही या दुरुस्ती करता येतात.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, संबंधित शेतकऱ्यांनी या त्रुटींची दुरुस्ती करावी. जेणेकरून नोव्हेंबरपासूनचे मदतीचे हप्ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्राप्त होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सर्व हप्ते आधारसंबंधित माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे योजनेसाठी दिलेले नाव आणि आधार कार्डवरील नाव, नावाचा क्रम, स्पेलिंग तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. तसेच नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामधील पहिली अक्षरे कॅपिटल असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये त्रुटी आहेत, अशा शेतकऱ्यांची गावनिहाय यादी संबंधित गावांमध्ये तलाठ्यामार्फत दर्शनी भागात लावण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप आपल्या माहितीमधील त्रुटी दूर केलेल्या नाहीत, अशा शेतकऱ्यांनी  नजीकच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जावून अथवा स्वतः https://www.pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx या लिंकचा वापर करून आपल्या आधारविषयक माहितीमधील त्रुटी दुरुस्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशी करा नावातील त्रुटींची दुरुस्ती
 शेतकऱ्यांनी त्रुटी कॉमन सर्विस सेंटर (CSC) मधून दुरुस्त केल्या जाऊ शकतात. तसेच स्वत: शेतकरी सुद्धा कोणत्याही अँन्ड्रॉईड मोबाईलचा वापर करून दुरुती करू शकतो. त्यासाठी  https://www.pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx या लिंकवर जावून माहिती दुरुस्त करावी. ाशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवरील हिरव्या पट्टीमधील डावीकडून क्रमांक आठवर फार्मर कॉर्नर’ (Farmer Corner) ची सुविधा देण्यात आली आहे. या फार्मर कॉर्नरवर जाऊन त्यामधील एडीट आधार फेल्युअर रेकॉर्ड्स’ (Edit Aadhar Failure Records) या पर्यायामध्ये जाऊन सबंधित लाभार्थ्याला आपला आधारक्रमांक टाकता येईल. आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांकाशी संलग्न नाव दुरुस्त करण्यासाठी उजव्या बाजूचे एडीट (Edit) बटण दाबून आधार कार्डावर नमूद नावाप्रमाणेच नाव टाकून उजव्या बाजूचे अपडेट’ (Update) हे बटण दाबावे. फार्मर नेम’ (Farmer Name) टाईप करतांना आधार कार्डावर ज्याप्रमाणे नाव टाकलेले आहे, त्याच क्रमाने नाव टाईप करणे अपेक्षित आहे.नाव टाईप करतांना स्वत:चे, वडिलाचे व आडनावाचे पहिले अक्षर हे मोठे (Capital) असावे. इतर अक्षरे लहान (Small) असावी. नावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती असल्यास आधार कार्डवरील नावाप्रमाणे त्याची अचूक दुरुस्ती करावी. उजव्या हातावरील निळ्या रंगाचे अपडेट’ (Update) बटण दाबावे. त्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली’ (Records Update Successfully) असा संदेश आल्यास आधार कार्ड विषयी त्रुटी दुरुस्त झाली असे समजावे. ज्या व्यक्तीच्या आधारविषयी काहीच त्रुटी नाहीत, अश्या व्यक्तीने त्यांचा आधार क्रमांक टाकल्यास रेकॉर्ड नॉट फाउंड’ (Records Not Found) असा संदेश येईल. यावरून सबंधित व्यक्तीच्या आधार कार्डाविषयी माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती नाही अथवा नव्हती असे समजावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ