राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार; 26 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव आमंत्रीत



अकोला,दि.10 (जिमाका)-  शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या अनुसूचित जाती,विजाभज व विशेषमागास प्रवर्गाच्या मुला-मुलीना राजर्षी शाह महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्याची योजना सुरु आहे.
 या योजनेंतर्गत सर्वसाधारण विद्याथ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ
महाविद्यालयामधून इयत्ता १० वी व १२ च्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती,विजाभज व विशेष मागास
प्रवर्गाच्या विद्याथ्योस रुपये पाच हजार रोख पारितोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते. संबंधित अकोला जिल्हयातील इयत्ता १० वी १२ वी चा निकाल घोषीत
झालेला आहे. सदर योजनेचे प्रस्ताव शाळा/ महाविद्यालयाकडून या कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात यावे.
तेव्हा सर्व संबंधित शाळा/महाविद्यालय प्रमुख यांना कळविण्यात येते की, परिपुर्ण प्रस्ताव
उदा.शाळा/महाविद्यालयामधून १० वी १२ वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम अनुसूचित जाती
विजाभज,विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावा प्रस्तावा सोबत , विद्यार्थ्यास सक्षम
प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची सांक्षाकित प्रत , विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा
दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स प्रत, शाळा/महाविद्यालयाच्या शिफारशीसह पाठविण्यात यावे असे यापुर्वी कळविण्यात आले आहे.
 याव्दारे पुनश्च दिनांक २६ डिसेंबर २०१९ पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला या कार्यालयात पाठवावे,जेणे करुन सदरील विद्याथ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणेया कार्यालयास सोईचे होईल.उपरोक्त कालमर्यादेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास विद्यार्थी सदर योजने पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वीजबाबदारी ही शाळा/महाविद्यालय प्रमुखांची राहिल यांची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी असे आवाहन सहाय्यकआयुक्त समाज कल्याण,अमोल यावलीकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ