30 नोव्हेंबर 14 अगोदर सावकारांकडुन कर्ज घेतलेले व अजुनही परतफेड न केलेल्या शेतक-यांनी अर्ज करावे- डॉ. लोखंडे


अकोला,दि.18 (जिमाका)-  विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या  क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांची कर्जमाफी. दिनांक 10 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जात माफी देण्यात आली होती. यानुसार एकूण 171.30 कोटी एवढे कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास साधा करून शेतक-यांना कर्ज मुक्त करण्यास मान्यता देण्यात आली होती.  सदर योजने मध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर येईल व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र असणार नाही अशी अट असल्यामुळे अकोला जिल्ह्यात एकूण पात्र शेतकरी 49 होते तसेच त्यांचे रुपये तीन लाख 96 हजार एवढेच कर्ज माफी पात्र ठरले होते तसेच 38 हजार 570 शेतकरी व व त्यांनी घेतलेले 37 कोटी रुपयाचे कर्ज माफीस पात्र होऊ शकले नाही. मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या  क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे 38 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून सुमारे 37 कोटी रुपयाचे कर्ज यासाठी पात्र ठरु शकतील.
अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना या सावकारी कर्जमाफीचा लाभ घेता न आल्यामुळे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. तत्कालीन 196 सावकारांनी जिल्ह्यामध्ये वाटप केलेल्या बहुसंख्य प्रकरणात वाटप करण्यात आलेले लाभार्थी हे सावकारी परवान्या वरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते त्यामुळेच या सावकारी कर्जमाफीचा लाभ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकला नव्हता. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला या कार्यालयामार्फत शासनास अहवाल सुद्धा सादर करण्यात आला होता.या निर्णयामुळे जिल्ह्यातील 342 गावातील 38 हजार शेतक-यांना 37 कोटी रुपये सावकारी कर्जातून मुक्ती मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
याबाबत सहकार आयुक्त यांचे मार्गदर्शक निर्देशानूसार सावकाराकडील खात्यांची तपासणी सुरु असुन त्यानूसार 31 डिसेंबर पर्यंत पात्र लाभार्थींना लाभ मिळण्याचे नियोजन करण्यात आले असुन पात्र शेतकर्यांनी विहीत नमुण्यातील अर्ज सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव कींवा संबंधित सावकार किंवा तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांचेकडे देवुन त्याची पोहोच घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ