बालगृह, शिशुगृहातील बालकांची आरोग्‍य तपासणी


अकोला,दि.30(जिमाका)- जिल्हा माहिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत बालगृह व शिशुगृहातील बालकांची  आरोग्य तपासणी  शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या  चमुने गुरूवार              दि.26 रोजी केली.
जिल्हा माहिला  व बालविकास विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात 4 बालगृहे  व 1 शिशुगृह कार्यरत असुन  काळजी व संरक्षणाची  गरज असणारी 135 बालके निवासी आहे.  गरूवार दि. 26 रोजी  शासकीय बालगृह व निरीक्षण गृह,  गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशुगृह येथील  बालकांची  शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील डॉक्टरांच्या चमुने आरोग्य तपासणी केली व बालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या वैद्यकीय पथकामध्ये  बालरोग तज्ञ, डॉ. सैयद सर ,दंतरोगतज्ञ डॉ. पुजा घारोळे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.हर्षा कारोडे, डॉ. आर्या बर्वे ,जनऔषधवैद्यक तज्ञ, डॉ. राजवर्धन गवई व इतर सहायक डॉक्टर होते शासकीय बालगृहात  21 बालके गायत्री बालिकाश्रमा मध्ये 65 बालिकांची व उत्कर्ष शिशुगृहात 18 बालकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीच्या वेळी शासकीय बालगहांचे अधिक्षक  झुंबर जाधव, गायत्री बालिकाश्रमाच्या  अधिक्षीका वैशाली भटकर, उत्कर्ष  शिशुगृहाचे अधिक्षक राजु  लाडुलकर  उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्याकरीता जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी योगेश जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण  कक्षाचे सुनिल लाडुलकर, सुनिल सरकटे, अँड.सिमा भाकरे, सचिन घाटे, नितीन अहीर, प्रविण कथे, निलेश पेशवे, संगिता अभ्यंकर, योगेंद्र खंडारे, रेश्मा मुरूमकार, रेवत खाडे यांनी  परिश्रम घेतले.
                                                 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले