शिकाऊ उमेदवारी परीक्षा जानेवारी -2020


अकोला,दि.13 (जिमाका)-  अकोला व वाशिम जिल्हयातील औद्योगिक आास्थापनांमधुन 30 ऑक्टोंबर 2019 पर्यंत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण  पुर्ण  केलेल्या उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित आस्थापनेमध्ये  15 डिसेंबर  2019  पर्यंत होणार आहे.   तसेच  थिअरी परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याबाबत वेळापत्रक प्राप्त झालेले आहे. विस्तृत वेळापत्रकाची प्रत मुलभूत प्रशिक्षण तथा  अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला  येथे सुचना फलकावर उपलब्ध आहे. शिकाऊ उमेदवारांना दिनांक  15 डिसेंबर पर्यंत आपआपल्या प्रोफाईल/बायोडाटा मध्ये दुरूस्ती करण्याची सोय Apprentiship पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  तसेच दिनांक 23 डिसेंबर ते दि. 4 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा अर्ज भरून अर्जाची  प्रत व परीक्षा शुल्क मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला या  कार्यालयात सादर करण्यात यावी. तसेच अधिक मार्गदर्शनासाठी वरील  कार्यालयास भेट देण्यात यावी असे मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य, यांनी कळविले आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ