सार्वजनिक वितरण व्यवस्था माहे जानेवारीचे अन्न धान्य परिमाण व नियतन


अकोला,दि.23(जिमाका)- जिल्ह्यात जानेवारी 2020 या महिन्यासाठीसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करावयाचे  अन्नधान्य  परिमाण व नियतन शासनाने निश्चित करुन दिले आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा शाखेकडून प्राप्त माहिती याप्रमाणे-
वाटप परिमाण-
लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत  अन्न-धान्य, नियंत्रिक साखर इ. जिवनावश्यक  वस्तूंचे वाटप परिणाम व दर जिल्हा पुरवठा शाखेने  शासनाच्या निर्देशानुसार निश्चित केले आहेत. ते याप्रमाणे-
१) प्राधान्य गट गहू- प्रतिव्यक्ती  तीन किलो (दर प्रति किलो दोन रुपये)
२) प्राधान्य गट तांदूळ- प्रतिव्यक्ती दोन किलो(प्रति किलो तीन रुपये)
३) अंत्योदय योजना गहू- प्रति कार्ड 15 किलो ( प्रति किलो दोन रुपये)
४) अंत्योदय योजना तांदूळ- प्रति कार्ड 20 किलो (प्रति किलो तीन रुपये)
५) एपीएल शेतकरी कुटूंबाकरीता गहू- प्रति व्यक्ती चार किलो (प्रति किलो दोन रुपये)
६) एपीएल शेतकरी कुटूंबाकरीता तांदूळ-  प्रति व्यक्ती एक किलो (प्रति किलो तीन रुपये)
७) अन्नपूर्णा योजना- प्रतिकार्ड पाच किलो गहू व तांदूळ प्रति कार्ड (मोफत)
८) नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता- एक किलो शिधापत्रिका( प्रति किलो 20 रुपये)
९) तूरडाळ अंत्योदय व प्राधान्य गटासाठी- दोन किलो ( प्रति किलो 55 रुपये)
१०)चनाडाळ अंत्योदय व प्राधान्य गटासाठी- दोन किलो (प्रति किलो 45 रुपये)
(तूर व चना डाळ दोन्ही हव्या असल्यास प्रति कार्ड एक किलो तूर व एक किलो चनाडाळ मिळेल.)
अन्नधान्य नियतनः-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत  समाविष्ट प्राधान्य गट व अंत्योदय लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी 2020 महिन्यासाठी  वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. ते याप्रमाणे-
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना (एकूण लाभार्थी संख्या 10 लक्ष 56 हजार 714) गहू 31 हजार 710 क्विंटल, तांदूळ 21 हजार 130 क्विंटल.
अंत्योदय लाभार्थी गट (कार्ड संख्या 45 हजार 56)- गहू 6770 क्विंटल, तांदूळ 9010 क्विंटल.
या प्रमाणे नियतन शासनाने मंजूर केले असल्याचे  जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी कळविले आहे.                                                                                                
                                                                       ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले