सशत्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन
अकोला,दि.7 (जिमाका)- सैनिकांच्या ऋणाची अंशतः का होईना परतफेड करण्याची संधी
ध्वजदिनाच्या माध्यमातून नागरीकांनी
ध्वजदिन निधीस उस्फुर्तपणे व सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन
सभागृहात आयोजीत ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, नायब तहसिलदार महेंद्र आत्राम, कल्याण संघटक तेजराव निखाडे , वसतिगृह अधिक्षक
गजानन पवार, वरिष्ठ लिपीक (निवृत्त) अशोक परळीकर, लिपीक टंकलेखक केशव घोडखांदे,
संतोष कुटे, नेरकर, खांबलकर , डोंगरे उपस्थित होते.
अकोला
जिल्हयाला मागील वर्षी शासनातर्फे 68 लक्ष 30 हजार 208रूपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांचे
प्रयत्नामुळे तसेच सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने तसेच सर्व
अकोलेकरांनी उदारमनाने आपले योगदान या राष्ट्रीय कार्यास देवून 95.45 टक्के
उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
या वर्षी म्हणजे 2019 करीता शासनाने जिल्हयास
रुपये 68लक्ष 30हजार रुपयाचे उद्दिष्ट देण्यात
आले असुन
सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व नागरीकांनी
राष्ट्रीय कार्यास योगदान देवून सशत्र
सेना ध्वजदिन 2019 निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करावी असे आवाहन
जिल्हाधिकारी तसेच अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण मंडळ यांनी केले आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी 5 ते 6 हजार सैनिक निवृत्त
होत असतात. ऐन उमंदिचा काळ आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्याच्या कार्यात ते
देशाच्या सरहद्दीवर थंडी, बर्फ, कडक ऊन्हाळा व पाऊस याची पर्वा न करता आपले कार्य करीत
असतात. उमेदीच्या काळातच सैन्यसेवेतुन निवृत्त झाल्यावरत्यांच्या व त्यांच्या
कुटुंबीयांच्याही पुर्नवसनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच कार्यरत असतांना
वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या पुर्नवसनाच्या समस्या निर्माण
होतात. माजी सैनिक, वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या अडिअडचणी
दूर करण्याकरीता तसेच आपले कर्तव्य बजावितअसतांना अपंगत्व प्राप्त झालेल्या
सैनिकांच्या पुर्नवसनाच्या निरनिराळया योजना महाराष्ट्र शासनराबवित असते. त्यासाठी
आवश्यकता पडते ती निधीची. या योजना राबवितांना लागणारा निधी गोळा करण्याच्या
कार्यक्रमासाठी सुरवात म्हणुन दरवर्षी 07 डिसेंबर हा दिवस 'सशस्त्र सेना
ध्वजदिन'म्हणुन पाळण्यात येतो. त्या निमित्ताने 07 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या 30
नोव्हेबर पर्यंत हा निधीगोळा करण्यात येतो.
जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय, अकोला यांनी माजी सैनिकांच्या कल्याणाच्या विविध
योजनाराबविण्याकरीता मागील वर्षी रुपयांचे 8,44655/- चे वाटप केले आहे.आपल्या
जिल्यात साधारणतः 8,900 माजी सैनिक व कुटुंबीय आहेत तसेच जिल्हयातील 14
सुपूत्रांनी वीरमरण पत्करले आहे. माजी सैनिकांच्या मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र
वसतीगृहांची सोय आहे. शिकणा-या मुलांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणीक खर्चाची
प्रतीपूर्ती, वैद्यकीय खर्च, स्वयंरोजगार,संगणक प्रशिक्षण, घरबांधणी, वसतीगृह खर्च
प्रतिपूर्ती, घरदुरुस्ती, विशेष गौरव पुरस्कार, ,परराज्यात व
परदेशात शिक्षणासाठी मदत, युध्द विधवांना घरकुलासाठी
मदत, अपंग माजी सैनिकांना आर्थिक मदत,युध्द विधवा व शौर्य पदकधारकांना बस
प्रवासभाडे सवलत, मतीमंद/अपंग पाल्यांना कौशल्य वाढविण्यासाठी, मुलींच्या
विवाहाकरीता आर्थिक मदत, श्रवणयंत्र, गंभीर आजारानंतरची देखभाल, सेवारत सैनिकाचा
मृत्यु झाल्यास कुटुंबीयाना आर्थिक मदत इत्यादी प्रकरणात आर्थिक मदत याच निधीतुन
करण्यात येते. या सर्व योजना ध्वजदिन निधीतून होणा-या संकलनातूनच पुर्ण करण्यात
येत असल्याची माहिती यावेळी प्रास्ताविकातुन केशव घोडखांदे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन सुमेध वानखडे यांनी तर
उपस्थितांचे आभार केशव घोडखांदे यांनी मानले. यावेळी माजीसैनिक , विरपत्नी , विरमाता तसेच सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी
उपस्थित होते.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा