महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा 2020 चे वेळापत्रक जाहीर


अकोला,दि.6 (जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवाआयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षात घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यात राज्यसेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा,महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसह कृषी सेवा परीक्षेचा समावेश आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या २०२० च्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल तर मुख्य परीक्षा ८, ९  व १० ऑगस्टरो जी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १ मार्च तर मुख्य परीक्षा १४ जून रोजी घेतली जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा १५ मार्च तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा १० मे तर मुख्य परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी असेल. महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा ५ जुलै रोजी तर १ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार आहे.तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा ६ सप्टेंबर, पोलिस उप निरीक्षक पद मुख्य परीक्षा १३ सप्टेंबर, राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २७ सप्टेंबर तर सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा १७ मे रोजी होणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबर रोजी होईल. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ७ जून रोजी होणार आहे. संयुक्त पेपर क्रमांक- एकची मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा ६ डिसेंबर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर कर सहायक मुख्य परीक्षा २० डिसेंबर, सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादीत विभागीय स्पर्धा परिक्षा २८ नोव्हेंबर २०२० रोजी घेतली जाणार आहे.
शासनाकडून संबंधीत संवर्ग पदांसाठी विहीत वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल गृहीतकाच्या आधारे अंदाजीत वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परिक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये बदल होऊ शकतो. अंदाजीत वेळापत्रका बाबतची  सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधीत परीक्षेमधून भरावयाचा पदसंख्ये बाबतचा सविस्तर तपशील जाहिरात /अधिसुचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी  www.mpsc.gov.in हे संकेतस्थळ पहावे, असे उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवाआयोग मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले