आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा
अकोला,दि.10 (जिमाका) - मानवाने मानवाशी
मानवाप्रमाणे वागले तर मानवी हक्क दिन साजरा करण्याचे काम पडणार
नाही. प्रत्येकाने आपल्या
हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र
लोणकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आज मंगळवार (दि.10) रोजी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही
सभागृहात आयोजीत करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या
कार्यक्रमला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय
खडसे, राठोड ॲकडमीचे संचालक स्वप्नील
राठोड, मानवधिकार वृत्त मासिकाचे मुख्य संपादक विजयकुमार
गडलिंगे, नायब तहसिलदार सतिश काळे,
ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजात
मानवी हक्क रूजू झाला असुन त्यांना वृध्दीगत करण्यासाठी जनजागृती करणे
आवश्यक असुन याची पायाभरणी शालेय
अभ्यासक्रमातून करावी असे प्रतिपादन स्वप्नील राठोड यांनी केले. आपल्यावर अन्याय
झाल्यास त्यासाठी मानवीहक्क आयोगाकडे दाद मागावी असे सांगुन शेजाराशी चांगले संबंध
ठेवणे हेच मानवी हक्काचे उत्तम उदाहरण असल्याचे विजयकुमार गडलिंगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
अधिक्षक मिरा पागोरे यांनी तर उपस्थितांचे आभार विधी अधिकारी संदिप ककांळे यांनी
मानले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नितीन निंबूळकर,
भाग्यश्री चौधरी, शिरीष बोडखेसह जिल्हा
प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा