नाताळ व नववर्ष निमित्य किरकोळ मद्यविक्री दुकानाचे वेळापत्रक


अकोला,दि.24(जिमाका)-   नाताळ -2019 नववर्ष -2020 आगमनाचे नमित्याने जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल- 3, एफएल-4, एफएलबिअर-2 व सीएल-3 किरकोळ   मद्यविक्री अनुज्ञप्त्या अधीक कालावधीकरीता खालील नमुद केलेल्या वेळेत सुरू ठेवण्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1)(सी) व कलम 143 (2)(एच-1) (4) अन्वये शासनाने मान्यता दिलेलेली आहे.
खालीलप्रमाणे  जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या अधीक कालावधीकरीता सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे.
अनुज्ञप्तीचा प्रकार- एफएल-2 विदेशीमद्य किरकोळ विक्रीचे दुकान एफएलबिआर-2 (बिअर शॉपी) दिनांक- 25 डिसेंबर  व 31 डिसेंबर 2019, शिथिल करावयाचा कालावधी- रात्री22.30 ते दुस-या  दिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत, अनुज्ञप्तीचा प्रकार-एफएल-3 परवानाकक्ष अनुज्ञप्ती) एफएल -4 (क्लब अनुज्ञप्ती) सीएल-3 (देशीदारू विक्री दुकाने), दिनांक 25 डिसेंबर  व 31 डिसेंबर 2019, शिथिल करावयाचा कालावधी- रात्री 23.00 ते दुस-या दिवशी पहाटे 5.00  वाजेपर्यंत.
तरी वरील प्रमाणे अनुज्ञप्तीच्या वेळेत सोबत देण्यात येत असल्याची सर्व संबधीत अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ