जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक; प्रशिक्षण व चर्चासत्र संपन्न




        अकोला,दि.7 (जिमाका)- रोजी सकाळी ११.०० वाजता अकोला जिल्‍हा परिषद व त्‍या अंतर्गत पंचायत समीतीच्‍या सार्वञीक निवडणूकाबाबत, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण व चर्चासञ जिल्‍हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृह येथे संपन्न झाले.  
या   प्रशिक्षणामध्‍ये उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी  राजेश खवले यांनी जिल्‍हा परिषद पंचायत समीती अधिनियम तरतूदीविषयक बाबीबाबत मार्गदर्शन केले. नामनिर्देशनपञा संबंधीत आवश्‍यक बाबीबाबत निवासी उपजिल्‍हाधिकारी  संजय खडसे, यांनी तर ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रियेबाबत अति. जिल्‍हा सुचना व विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. मतमोजणीबाबत उपविभागीय अधिकारी निलेश अपार, यांनी तर मतदान यंञाचे प्रशिक्षण (ई.व्‍ही.एम.) याबाबत बाळापूरचे तहसिलदार पुरूषोत्‍तम भुसारी व निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार सतीश काळे, यांनी मार्गदर्शन केले.
तसेच आदर्श आचारसंहिता बाबत मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, यांनी तर निवडणूकीची संक्षिप्‍त प्रक्रियेबाबत व राज्‍य निवडणूक आयोगाचे प्राप्‍त निर्देशाबाबत निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे यांनी मार्गदर्शन केले.
         नामनिर्देशनपञासाठी मत्‍ता व दायीत्‍व,गुन्‍हेगारी पार्श्‍वभुमीचे शपथपञ,नोटरी स्‍टॅम्‍प,२००१ नंतर दोन पेक्षा जास्‍त अपत्‍य नसल्‍याचे शपथपञ,शौचालय वापराबाबतचे ग्रामसभेच्‍या ठरावासोबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपञ, राखीव जागा असल्‍यास जातीचे प्रमाणपञाची प्रत, जात पडताळणी प्रमाणपञाची प्रत नसल्‍यास हमीपञ, व सादर केल्‍याची  पोच,जिल्‍हा परिषदेसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला हजार रूपये व  राखीव उमेदवाराला 500 रूपये अनामत रक्‍कम तर  पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला 700 रूपये व  राखीव उमेदवाराला 350 रूपये अनामत रक्‍कम   भरणे आवश्यक आहे. स्‍वतंञ बॅंक खाते उघडणे आवश्‍यक आहे, इत्‍यादी सर्व नामनिर्देश पञाबाबत माहीती देण्‍यात आली.
                                00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले