मतदार पडताळणी कार्यक्रमामध्‍ये सर्वांनी सहभागी व्‍हावे

अकोला,दि.३१(जिमाका)- दिनांक 1 जानेवारी, 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देण्यासाठी दिनांक 01.01.2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम  तसेच मतदार यादीमध्ये मृत/स्थलांतरित मतदाराची नावे असल्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत आणि यामुळे मोहिम रूपाने सर्व मतदारांचा तपशील व छायाचित्रे दुरुस्त व प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार आयोगाने सन 2020 च्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमापूर्वी पूर्वतयारी म्हणुन मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) घेणेबाबत निर्देश दिलेले आहेत.   
                        त्‍याअनुषंगाने मतदार पडताळणी EVP कार्यक्रमामध्ये, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन  खालील  कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची प्रत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडे देऊन त्यांच्या सध्या असलेल्या मतदार तपशीलांचे प्रमाणिकरण याव्‍दारे अकोला जिल्‍हयातील नागरीकांना आवाहन करण्‍यात येत आहे.
१. भारतीय पासपोर्ट २. ड्रायव्हिंग लायसन्स 3. आधार कार्ड 4. रेशन कार्ड 5. सरकारी / निम-सरकारी अधिका-यांचे ओळखपत्र 6. बँक पासबुक 7. शेतकऱ्याचे ओळखपत्र 8. पॅन कार्ड 9. एन.पी.आर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड आणि १०. त्याच्या पत्त्यासाठी अर्जदाराच्या नावे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जसे पालकांच्या नावे असलेल्या पाण्याचे / टेलिफोन / वीज / गॅस कनेक्शनचे सध्याचे बिल,
                            EVP कार्यक्रमांतर्गत नागरिक "मतदार हेल्पलाइन" मोबाइल अ‍ॅपद्वारे,  nvsp पोर्टलद्वारे, सामान्य सेवा केंद्रांवर (सीएससी) भेट देऊन किंवा भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी बीएलओमार्फत मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे सादर करून त्यांचे मतदार तपशील तपासू शकतील. मतदारांच्या तपशिलांच्या प्रमाणीकरणासाठी पुढील प्रक्रिया केली जाईल.
1. मतदाराच्या तपशीलात काही विसंगती आढळल्यास 
2. मृत/पत्ता बदल झालेल्या सदस्यांच्या बाबतीत, जवळच्या नातेवाईक/कुटूंबाच्या सदस्याकडून भरला जाईल. (फॉर्म 7 सह अर्जदार हा तो मयत मतदाराचा जवळचा नातेवाईक/कुटुंबातील सदस्य असल्याचे निवेदन सादर करील).
3. नोंदणी न झालेल्या पात्र मतदारांना नोंदणीसाठी फॉर्म-6 भरण्याची सुविधा देण्यात येईल.
                         डेटाबेसमध्ये माहिती ठेवण्यासाठी संभाव्य मतदारांचा तपशील गोळा केला जाईल व  दिव्यांग मतदारांना त्यांची माहिती देण्यासाठी मतदार हेल्पलाईन क्रमांक 1950 च्या माध्यमातून सुविधा दिली जाईल.
                          बीएलओ हे प्रमाणीकरणाच्या वेळीच मतदारांनी सादर केलेल्या तपशिलांची पडताळणी करतील आणि ज्या मतदारांनी त्यांचे प्रमाणित तपशील सादर केले नाहीत अशा मतदारांकडून त्यांचा तपशील गोळा करतील.  म्हणजेच,  मतदार पडताळणी कार्यक्रम (ईव्हीपी) अंतर्गत विविध माध्यमाद्वारा मतदाराचा प्राप्त होणारा तपशिल आणि मतदाराची पडताळणी व प्रमाणीकरण  करण्यासाठी बीएलओद्वारे  घरोघरी जाऊन मतदाराची माहिती / तपशील जमा करण्याची कार्यवाही या दोन्ही बाबी एकाच वेळी सुरू राहतील.

                        वर दर्शविलेल्‍या कार्यक्रमानुसार अकोला जिल्‍ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्‍ट करणे, नाव वगळणे ईत्‍यादी करिता मतदान केंद्रस्‍तरीय अधिकरी (BLO) यांचेकडे आवश्‍यक फॉर्म भरुन देण्यात यावे मतदार यादीतील दुबार, स्‍थालांतरित,मयत मतदारांची नावे वगळण्‍याची कार्यवाही सुध्‍दा प्रस्‍तृत मोहिमेत घेण्‍यात येणार आहे.  तरी अकोला जिल्‍ह्यातील सर्व संबंधीतांनी याबाबत आपले विहित नमुन्‍यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्‍तरीय अधिकरी (BLO) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्‍यात यावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले