रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन


अकोला,दि.(जिमाका)- शासनाने रब्बी हंगाम २०१९- मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गहू (बागायत), हरभरा व कांदा पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ डिसेंबर २०१९ अशी आहे व उन्हाळी भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी दि.१ एप्रिल २०२० अशी आहे.  या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अकोला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
 या संदर्भात कृषि विभागातून दिलेल्या माहितीनुसार, तसेच कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाईल तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहित केलेल्या अर्जात विमा हप्ता विहित कालावधी मध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर वर भरावयाचा आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०१९-२० अंमलबजावणीकरिता भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.  त्यांचा संपर्क पत्ता याप्रमाणे- भारती एक्सा जनरल इन्शुरंस कं.लि.१९ वा मजला, परिणी क्रुसेंझो जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स,एम सी ए क्लब समोर, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ फोन नं. ०२२-४९१८१५०० टोल फ्री. क्रमांक १८००१०३२२९२.
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता खालीलप्रमाणे-
अ.क्र.
पिकाचे नाव
विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)
विमा हप्ता दर
(टक्के)
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता (रु)
गहू बागायत
३५०००/-
१.५०
५२५.००          
हरभरा
२४०००/-
१.५०
३६०.००
उन्हाळी भुईमुग
३८०००/-
१.५०
५७०.००
रब्बी कांदा
७३०००/-
५.००
३६५०.००
 या योजनेत समाविष्ट करण्यात आलेली अधिसूचित पिके, महसूल मंडळ व समाविष्ट तालुक्यांची संख्या याप्रमाणे-
१)     गह बागायत, हरभरा, सर्व तालुके व जिल्ह्यातील सर्व (५२) महसूल मंडळे.
२)     उन्हाळी भुईमुग - अकोट, पातुर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा.
३)     रब्बी कांदा-बाळापूर,पातूर,मूर्तिजापूर,अकोला,अकोट, तेल्हारा,
विमा संरक्षणाच्या बाबी- १) पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (standing crop ), २) पिक पेरणी पूर्व/ लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे., ३) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे., ४) काढणी पश्च्यात नुकसान,५) स्थानिक नैसर्गिक आपत्ती.
तरी शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा. त्यासाठी अंतिम मूदत गहू, हरभरा, व कांदा पिकासाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व उन्हाळी भुईमुग पिकासाठी  दि. १ एप्रिल २०२० या प्रमाणे आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. त्यासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ