जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक; राजकीय पक्षांची आढावा सभा




        अकोला,दि.16 (जिमाका)-  जिल्‍हा परिषद व त्‍या अंतर्गत पंचायत समीतीच्‍या सार्वञीक निवडणूकाबाबत माहिती देण्यासाठी  अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्रभारी जिल्‍हाधिकारी  नरेंद्र लोणकर  यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांची आढावा सभा संपन्न झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अति. जिल्‍हा सुचना व विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले , तसेच मुकेश मुरूमकार, नितीन सांगोळे, आस्तिक चव्हाण, प्रमोद देडंवे , सिध्दार्थ शिरसाठ , माधव मानकर , अभिमन्यु नळकांडे, विजय फुकट, राजेंद्र पातोंडे, एस.एस. चौधरी ,राजु गांवडे, कपील रावदेव आदि राजकीय पक्षांचे  पदाधिकारी /प्रतिनीधी उपस्थित होते.
जिल्‍हा परिषद पंचायत समीती अधिनियम तरतूदीविषयक बाबीबाबत, नामनिर्देशनपञा संबंधीत आवश्‍यक बाबीबाबत ,ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रियेबाबत ,आदर्श आचारसंहिता , निवडणूकीची संक्षिप्‍त प्रक्रियेबाबत व राज्‍य निवडणूक आयोगाचे प्राप्‍त निर्देशाबाबत माहिती यावेळी देण्यात आली.
         नामनिर्देशनपञासाठी मत्‍ता व दायीत्‍व,गुन्‍हेगारी पार्श्‍वभुमीचे शपथपञ,नोटरी स्‍टॅम्‍प,२००१ नंतर दोन पेक्षा जास्‍त अपत्‍य नसल्‍याचे शपथपञ,शौचालय वापराबाबतचे ग्रामसभेच्‍या ठरावासोबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपञ, राखीव जागा असल्‍यास जातीचे प्रमाणपञाची प्रत, जात पडताळणी प्रमाणपञाची प्रत नसल्‍यास हमीपञ, व सादर केल्‍याची  पोच,जिल्‍हा परिषदेसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला हजार रूपये व  राखीव उमेदवाराला 500 रूपये अनामत रक्‍कम तर  पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला 700 रूपये व  राखीव उमेदवाराला 350 रूपये अनामत रक्‍कम   भरणे आवश्यक आहे. स्‍वतंञ बॅंक खाते उघडणे आवश्‍यक आहे, इत्‍यादी सर्व नामनिर्देश पञाबाबत माहीती देण्‍यात आली.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले