शिक्षक मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध


अकोला,दि.30(जिमाका)- अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघातील अंतिम मतदार यादी  आज (सोमवार, दि. 30) पासुन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, तसेच  जिल्ह्यातील सर्व तहसिल , उपविभागीय कार्यालये येथील सुचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघाच्या मतदारांनी  याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन  शिक्षक मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी  अधिकारी तथा जिल्हाधिकारी अकोला जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेली माहिती अशी की, मा. भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2019  या अर्हता  दिनांकावर  आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीच्या कार्यक्रम घोषित  केला होता. या कार्यक्रमा अंतर्गत प्राप्त  दावे व हरकती नुसार प्राप्त दि. 23 नोव्हेंबर  रोजी प्रारूप  मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. त्या नंतर पुन्हा दि. 23 नोव्हेंबर ते दि.9 डिसेंबर  या कालावधीमध्ये प्राप्त झालेले दावे व हरकती  निकाली काढून अंतिम मतदार यादी आज (सोमवार, दि. 30 रोजी ) जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नोटीस बोर्डावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय , उपविभागीय अधिकारी कार्यालय, इ. ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  तरी अकोला जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघातील सर्व मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, शिक्षक मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी अकोला जितेंद्र  पापळकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा