सार्वजनिक वितरण व्यवस्था: माहे डिसेंबरचे अन्न धान्य परिमाण व नियतन
अकोला,दि.३(जिमाका)- जिल्ह्यात डिसेंबर
२०१९ या महिन्यासाठीसार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करावयाचे अन्नधान्य परिमाण व नियतन शासनाने निश्चित करुन दिले आहे.
या संदर्भात जिल्हा पुरवठा शाखेकडून प्राप्त माहिती याप्रमाणे-
वाटप परिमाण-
लक्षनिर्धारित सार्वजनिक
वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न-धान्य, नियंत्रिक
साखर इ. जिवनावश्यक वस्तूंचे वाटप परिणाम
व दर जिल्हा पुरवठा शाखेने शासनाच्या निर्देशानुसार
निश्चित केले आहेत. ते याप्रमाणे-
१) प्राधान्य गट गहू-
प्रतिव्यक्ती तीन किलो (दर प्रति किलो दोन
रुपये)
२) प्राधान्य गट तांदूळ-
प्रतिव्यक्ती दोन किलो(प्रति किलो तीन रुपये)
३) अंत्योदय योजना
गहू- प्रति कार्ड १५ किलो ( प्रति किलो दोन रुपये)
४) अंत्योदय योजना
तांदूळ- प्रति कार्ड २० किलो (प्रति किलो तीन रुपये)
५) एपीएल शेतकरी कुटूंबाकरीता
गहू- प्रति व्यक्ती चार किलो (प्रति किलो दोन रुपये)
६) एपीएल शेतकरी
कुटूंबाकरीता तांदूळ- प्रति व्यक्ती एक
किलो (प्रति किलो तीन रुपये)
७) अन्नपूर्णा
योजना- प्रतिकार्ड पाच किलो गहू व तांदूळ प्रति कार्ड (मोफत)
८) नियंत्रित साखर
अंत्योदय लाभार्थ्यांकरीता- एक किलो शिधापत्रिका( प्रति किलो २० रुपये)
९) तूरडाळ अंत्योदय
व प्राधान्य गटासाठी- दोन किलो ( प्रति किलो ५५ रुपये)
१०)चनाडाळ
अंत्योदय व प्राधान्य गटासाठी- दोन किलो (प्रति किलो ४५ रुपये)
(तूर व चना डाळ
दोन्ही हव्या असल्यास प्रति कार्ड एक किलो तूर व एक किलो चनाडाळ मिळेल.)
अन्नधान्य नियतनः-
राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट
प्राधान्य गट व अंत्योदय लाभार्थ्यांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत डिसेंबर
२०१९ महिन्यासाठी वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे
नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. ते याप्रमाणे-
प्राधान्य गटातील
लाभार्थ्यांना (एकूण लाभार्थी संख्या १० लक्ष ५६ हजार ७१४) – गहू ३१ हजार ७१०
क्विंटल, तांदूळ २१ हजार १३० क्विंटल.
अंत्योदय लाभार्थी
गट (कार्ड संख्या ४५ हजार ५६)- गहू ६७६० क्विंटल, तांदूळ ९०१० क्विंटल.
कल्याणकारी संस्था
व वसतीगृहांसाठी नियतन (ऑक्टोबर २०१९ ते
मार्च २०२० कालावधी करीता)-
गहू २९९.५
क्विंटल, तांदूळ २८१.५१ क्विंटल.
या प्रमाणे नियतन
शासनाने मंजूर केले असल्याचे जिल्हा पुरवठा
अधिकारी बी.यु. काळे यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा