जिल्हा स्तरीय तंबाखु नियंत्रण समितीची सभा संपन्न



अकोला,दि.16(जिमाका)- तंबाखु नियंत्रण  कार्यक्रम  राबविण्याकरीता  तसेच कोटपा ॲक्ट 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी  संयुक्त पथक तयार करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी दिले.राष्ट्रीय  तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा समन्वय व जिल्हा स्तरीय तंबाखु नियंत्रण समिती सभा  प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या  अध्यक्षतेखाली अपर जिल्हाधिकारी यांचे दालनात सोमवार (दि.16) रोजी संपन्न झाली.  
 या सभेमध्ये  जिल्ह्यात  प्रभावीपणे  तंबाखु नियंत्रण  कार्यक्रम  राबविण्याकरीता  जिल्हाधिकारी  यांनी गावपातळी ते जिल्हापातळी पर्यंत जिल्ह्यातील सर्व तंबाखु विक्री केंद्रे व  पान टप-यांवर चेतावणी दर्शक कर्करोग चित्ररूपी सुचना व  18 वर्षा आतील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे कायदेने गुन्हा आहे असे फलक दर्शनीय ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय तंबाखु  नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृतीची  सुरूवात ही  शाळा, महाविद्यालयांपासुन होत असल्याने कोटपा कायदानुसार शैक्षणिक  संस्थेच्या   100 यार्ड अंतरापर्यंत तंबाखु विक्री केंद्रे  व पान टप-यां हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी संबंधीत  विभागांना दिले.
 यावेळी मानसशास्त्रज्ञ प्रा. डॉ. राजेंद्र पाटील , आरोग्य व तंबाखु नियंत्रण क्षेत्रात काम करणा-या  संस्थेचे  डॉ. योगेश शाहु, प्रा. मोहन  खडसे, प्रा. संकेत काळे,  अन्न सुरक्षा अधिकारी ग.वा. गोरे, ,मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.  फारूक शेख, आदींची उपस्थिती होती.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण  यांच्या मार्गदर्शनात पीपीटी प्रेझेन्टेंशन  राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण  कार्यक्रमाचे डॉ.  प्रीती कोगदे धम्मसेन शिरसाट व जे.बी. अवघड यांनी पीसीपीएनडीटी या  कार्यक्रमाविषयी उपस्थित सदस्यांना माहिती दिली.
000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ