20 डिसेंबर रोजी डाक अदालत
अकोला,दि.18 (जिमाका)- डाक सेवे बाबत असे टपाल
स्पीड पोस्ट डाक वस्तू,पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर बाबतची आपली तक्रार सहा आठवड्या पेक्षा जास्त काळ अुनुतरीत असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी आपण डाक अदालत मध्ये दाद मागू
शकता.
अनुतरीत तक्रार बाबत अर्ज व त्यासोबत
मुळ तक्रारीची प्रत ज्या अधिका-यांकडे
दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी, खालील अधिका-यांकडे आपली तक्रार दिनांक 19 डिसेंबर 2019 पुर्वी समक्ष अथवा पोस्टाने
प्रवर अधिक्षक डाकघर अकोला विभाग सिव्हिल लाईन्स, अकोला – 444001 या पत्तावर
पाठवावी.
डाक अदालत दिनांक 20 डिसेंबर 2019
रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यालय प्रवर
अधिक्षक डाकघर अकोला विभाग अकोला सिव्हिल
लाईन्स, अकोला 444001 येथे भरेल. त्यामध्ये सदर व्यक्तीस स्वत:चे खर्चाने हजर
राहता येईल. असे प्रवर अधिक्षक डाकघर अकोला यांनी कळविलेले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा