जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक


अकोला,दि.23(जिमाका)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणा-या उमेदवारांना आपल्या निवडणुक   प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यापुर्वी प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय  माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणीकरण समितीकडे अर्ज करावा; असे आवाहन जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले आहे.
या संदर्भात आज येथील लोकशाही सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक संदर्भात पेड न्युज समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याबैठकीला  निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे व माध्यम सनियंत्रण  व जाहिरात  प्रमाणिकरण समितीचे सदस्य  उपस्थित होते.
 उमेदवारांनी किंवा पक्षाव्दारे टेलिव्हीजन किंवा रेडिओवर  प्रसारीत होणा-या  कोणतीही जाहिराती प्रसारीत करण्यापुर्वी   प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे.  प्रस्तावित जाहिरात  तयार करण्यासाठी आलेला खर्च , प्रसारीत करण्यासाठी येणारा खर्च, जाहिरात कोणत्या उमेदवारांसाठी / पक्षासाठी देण्यात येणार आहे आदि माहिती जाहिरात प्रमाणीत करण्याच्या अर्जामध्ये नमुद करावी.
तसेच  काही उमेदवार, राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये वर्तमानपत्रामधील बातम्यांच्या स्वरुपातआपली जाहिरात करतात. या जाहिरातीचे दृश्य स्वरुप जरी बातमी सारखे असले तराहीप्रत्यक्षात प्रसार माध्यमांना किंमत देऊन अशा बातम्या छापून आणल्या जातात. उदा.-(अ) संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असलेल्या क्षेत्रात प्रसिध्द होणा-या / वितरित होणा-या वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या विशिष्ट पक्षाशी अथवा उमेदवाराशीसंबंधित असून त्याची वारंवारता फार जास्त असते.(ब) एखादया प्रसार माध्यमामार्फत विशिष्ट पक्षाची अथवा उमेदवाराची प्रचार सभा, भाषणे अथवा इतर कार्यक्रम ज्याला अवास्तव प्रसिध्दी देण्यात येते.  अशा प्रकाराला पेड न्युज असे म्हणतात.
पेड न्यूजच्या संदर्भात समिती पुढीलप्रमाणे कार्यवाही करेल :-
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यावर सदर समिती एक वार्ताहर परिषद घेऊन तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना देऊन निवडणुकांमध्ये होणा-या पेड न्यूज म्हणजे काय याची माहिती सर्व संबंधितांना देईल. तसेच अशाप्रकारे पेड न्यूजबाबत आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याकरिता जाहिरात समितीचे गठन केलेले आहे हे सर्वाच्या निदर्शनास आणेल. सदर समिती संबंधित जिल्हयात प्रसिध्द होणा-या / वितरित होणा-या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज यामध्ये मोडणा-या बातम्या निवडणुकीच्या कालावधीत प्रसिध्द होत आहेत यासंदर्भात तक्रार आल्यास अश्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या पेड न्यूज या सदराखाली मोडतात किंवा कसे याची निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत छाननी करेल. एखादी राजकीय जाहिरात / उमेदवाराची बातमी पेड न्यूजच्या स्वरुपात असल्याचे समितीचे मत झाल्यास या बातमीवर, जाहिरातीवर झालेला खर्च उमेदवारांच्या खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये अशी नोटीस संबंधित पक्ष उमेदवार यांना देईल. या समितीकडे संबंधित पक्ष, उमेदवार तसेच प्रसार माध्यम यांनी आपली बाजूलेखी स्वरुपात मांडल्यानंतर समिती यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल. एखादी बातमी पेड न्यूज आहे असे समितीचे मत झाल्यास या पेड न्यूजवर झालेला सर्व संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खचामध्ये समाविष्ट करण्याबाबत संबंधितनिवडणूक निर्णय अधिका-यांना कळवेल. अशी माहिती यावेळी देण्यात आली. तरी उमेदवारांनी आपल्या जाहिराती  पुर्व प्रमाणित करून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
                                                         00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले