उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जानेवारी महिन्यातील तालुकास्तरीय शिबीर रद्द


अकोला,दि.30 (जिमाका)-  मोटारवाहन निरिक्षक यांच्या मार्फत मोटार वाहन नोंदणी तपासणी वाहन चालक  अनूज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर आयोजित करण्यात येतात. त्याचा माहे जानेवारी ते जुन 2020 साठी शिबिरांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये होणारे दि. 6 जानेवारी व 7 जानेवारी 2020 तेल्हारा येथील मासिक दौरे निवडणुक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या आचार संहितेमुळे रद्द करण्यात आले आहेत, याची नोंद घ्यावी,असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना