नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प: कृषि व्यवसाय स्थापनेसाठी वित्तीय संस्था संलग्नतेची अट शिथिल


अकोला,दि.(जिमाका)- जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात सहभागी संस्थांसाठी कृषि व्यवसाय स्थापनेसाठी आवश्यक असलेली वित्तीय संस्था संलग्नतेची अट शिथिल करण्यात आली असल्याची माहिती ‘आत्मा’ प्रकल्प संचालक  मोहन वाघ यांनी केले आहे.
जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प जिल्हयात राबविण्यात येत आहे. हवामान बदलाचा भुगर्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. या प्रतिकुल परीस्थितीमध्ये हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन व जागतीक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यामध्ये एकूण १५ जिल्ह्यांमध्ये  हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात अकोला जिल्ह्यातील एकूण ४९८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक तसेच सामुहिकस्तरावर प्रकल्पामध्ये समाविष्ट घटकांना अनुदान दिले जाते.
योजनेची वैशिष्टे -
१. ग्रामस्तरावरील ग्राम कृषि संजीवनी समितीव्दारे प्रकल्पाची अंमलबजावणी.
२. ग्रामस्तरावर वास्तव्यास राहुन गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा त्रयस्त संस्थेमार्फत तयार करण्यात आला आहे.
३. वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांकडून एक कागदही न घेता Online प्रक्रियेव्दारे राबविले जाणार आहे.
४. गावाचे नियोजन करतांना आर्थिक बाबी बाबत महत्तम मर्यादा विचारात घेतली जात नाही. त्यामळे लाभार्थ्यांना आवश्यकतेप्रमाणे कितीही घटकांसाठी अर्ज करता येणार आहे.
५. अर्ज करण्यासाठी प्रकल्पांचे कर्मचारी गावांमध्ये उपस्थित राहुन लाभाची नोंदणी व अर्ज प्रक्रिया करुन घेत आहे.
६. लाभार्थ्यांना त्यांच्या घटकांचा लाभ त्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता नाही.
या प्रकल्पा अंतर्गत  समाविष्ट शेतकरी गट, शेतकरी/महीला /भुमिहिन व्यक्तींचे इच्छुक गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना खालील उद्देशांसाठी अनुदान दिले जाते. त्यात- १) कृषि उत्पादनाचे संकलन केंद्र २) कृषि उत्पादनाचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र ३)गोदाम व छोटे वेअर हाऊस ४) फळ पिकवणी केंद्र ५) कृषि मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र ६) फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शीतवाहन ७) वातानुकूलित कृषि माल विक्री केंद्र ८)व्हेंडींग कार्ट ९) कृषि माल प्रक्रीया केंद्र १०) इतर कृषि आधारीत व्यवसाय यांचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन तसेच शेतमाल वृध्दीसाठी हवामान अनुकूल मुल्यसाखळीचे बळकटीकरण करणे या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या/शेतकरी उत्पादक संघ व प्रकल्पांत निवड झालेल्या गावांतील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी/महीला /भुमिहिन व्यक्तींचे इच्छुक गटांना शेतीवर आधारीत उद्योगांसाठी प्रकल्प खर्चाच्या ६०% अर्थसहाय्य देण्यात येते.या प्रस्तावांना बॅंक लोन आवश्यक होते परंतु प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या पत्रानुसार बॅंक वित्तीय संस्था संलग्न असलेली अट वीस लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांसाठी शिथिल करण्यात आली असल्याचे आत्मा प्रकल्प संचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे. तरी शेतकरी उत्पादक कंपन्या/शेतकरी उत्पादक संघ नोंदणीकृत गट यांनी  अनुदानासाठी अर्ज करावे असे आवाहनही  ‘आत्मा’ प्रकल्प संचालक  मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. ज्या गटाला अर्थसाह्य देऊन राहले त्या गटातील सभासदांना माहित आहे का हेसुद्धा तपासून पहावे सभासदांना काहीच लाभ मिळत नाही याची नोंद घ्यावी अशी विनंती

    उत्तर द्याहटवा
  2. शेतकरी गट हा एक नातेवाईकांचा गट आहे या गटातील लोकांना फायदे मिळत नाही आहे प्रत्येक गटातील सभासदांच्या खात्यामध्ये कर्ज देण्यात यावे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले