सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध अर्थसहाय्याच योजनांसाठी अर्ज आमंत्रीत
अकोला,दि.9(जिमाका)- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता
यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण
विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांच्या मार्फत राबविण्यात येतात. त्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन
रॉय ग्रंथालय तिष्ठानच्या www.mlf.gov.in या यासंकेतस्थळावर
उपलब्ध असुन इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदरसंकेतस्थळावरुन
उपलब्ध करून घेऊन 20 डिसेंबर पर्यंत पाठवावेत
असे आवाहन ग्रंथालय संचालनालय मुंबईचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे.
सन 2019-20 साठी
असमान निधी योजना (Non Matching Schemes) या प्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी
संस्थांना ग्रंथ, साधन साम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान
निधीतून अर्थसहाय्य."राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा"
विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य.महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य.राष्ट्रीय स्तरीवरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य,बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य., या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rlf.gov.in हेसंकेतस्थळपहावे.
आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत
चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. २० डिसेंबर, २०१९ पर्यंत पोहचतील अशा बेताने
पाठवावेत.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा