अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले




अकोला,दि.18 (जिमाका)-  अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहावे असे आवाहन  उपजिल्हा निवडणूक अधिकारी  राजेश खवले यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निर्देशानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  लोकशाही सभागृहात  कार्यक्रमाचे आयोजन  उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ॲड. परवेज डोकालीया  हे होते. या कार्यक्रमाला  अल्पसंख्याक समितीचे अशासकीय सदस्य अबुल नईम मो. इसाक , नौशाद खान  समद खान  ,  डॉ. आर .एफ. सैय्यद , अबदुल अलीम देशमुख,  सै. अहमद , मैहमुद उस्माद ,  असद अहमद खान, सै. इमरान अली ,  जिल्हा परिषदेचे शाहू भगत, गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले , जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लता खानंदे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्म व भाषा  यावर आधारीत अल्पसंख्याक समाज आहे. धर्म व भाषेनुसार यात  भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून  कार्यरत राहावे. देशात अखंडीतता राखण्यासाठी  परंपरा , संस्कृती, भाषा व धर्म एका समुदायाने  दुस-या समुदायावर लादु नये.  घटना व कायादयानुसार प्रत्येकाला आपला हक्क दिलेला आहे. प्रत्येकाला  स्वातंत्र आहे असे ॲड परवेज यांनी वेगवेगळे उदाहरण देवून उपस्थितांना समजावून सांगितले.
अल्पसंख्याक समुदयासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनाची माहिती सर्वांपर्यत पोहचली पाहिजे तसेच या योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदयाला मिळाला पाहिजे अशी चर्चा यावेळी झाली. स्पर्धेच्या प्रवाहात अल्पसंख्याक व्यक्ती टिकुन राहावा यासाठी मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. मदरसा मधुन धार्मिक शिक्षणासोबत  शासनाने  नेमुन दिलेले इतरही शिक्षण झाले पाहिजे त्यामुळे मदरसा मधुन शिक्षण घेवून आलेला विदयार्थी बाहेरील वातावरणात  व स्पर्धेत  टिकला पाहिजे. असे मत या चर्चासत्रातुन व्यक्त करण्यात आले.
अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांनी केले. यावेळी अल्पसंख्यांक कक्षाच्या श्रीमती बाजारे सह  प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
********     


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा