अन्नदिनानिमित्य जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे कार्यक्रम संपन्न
अकोला,दि.9 (जिमाका)- . अन्नदिनाच्यानिमीत्ताने रास्तभाव दुकानांमधुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थीना
धान्य पुरवठा व्हावा याकरीताप्रत्येक महीण्याचे 7 तारखेच्या आत पुरवठा विभागाचे लक्ष
निर्धारीत सार्वतनीक वितरण प्रणाली व्दारे रास्तभाव दुकानांमधे धान्य पुरवठा करण्यात
येतो. तसेच प्रत्येक महीण्याचे 7 ते 14 तारीखपर्यंत अन्नसप्ताह साजरा करण्यात येतो.
दिनांक 07 डिसेंबर रोजी अन्नदिनानिमीत्त जिल्हा पुरवठा अधिकारी
बि. यू. काळे यांनी अनन धानय वितरण अधिकारी तसेच निरिक्षण अधिकारी यांचे समवेत अकोला
शहरातील रास्तभाव दकानांना भेटी दिल्या. तप्ती महीला बचत गट शीम बायपास येथील दकानाला
भेट दिली असता अन्न दिवसापर्यंत 76 टक्के कार्डधारकांनी धान्याचीउचल केल्याचे आढळून
आले.
धान्य घेण्याकरीता आलेल्या कार्डधारकांशी
जिल्हा पुरवठाअधिकारी यांनी संवाद साधला. Aepds अंतर्गत epos मशीनव्दारे बायोमेट्रीक
ओळख पटवूनधान्य वितरणात होत असलेल्या ऑनलाईन धान्य वाटपाबाबत कार्ड धारकांनी समाधान
व्यक्तकेले. E-pos मशीनव्दारे धान्य अंगठा लावुन परिमानानुसार मीळत असल्याचे कार्डधारकांनीसांगीतले.
धान्य वाटपात काही अडचण नसल्याचे कार्ड धारकांनी सांगीतले. रास्तभावदुकानांमधुन ऑनलाईन
पध्दतीने धान्य वाटपामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. तसेचकार्ड धारकांना विहीत
मुदतीत व सुरळीतपणे धान्य पुरवठा होत असल्याबाबत कार्ड धारकांनीसांगीतले._Aepds प्रणाली
अंतर्गत epos मशीनव्दारे धान्य वाटप होत असल्यामुळे रास्तभाव दुकानादारांचेही काम सोपे
झाले आहे.
याव्दारे पात्र लाभार्थीना आवाहन करण्यात
येते की त्यांनी प्रत्येक महीण्याचे 7 तारखेस जास्तीज जास्त संखेने आपले राशन कार्ड
जोडले असलेल्या रास्तभाव दुकानामधुन धान्य उचल करावी. तसचे प्रत्येक महीण्याचे 7 ते
14 तारीख पर्यंत धानय् घेवुन शासनाचे अन्न सप्ताहाचा उददेश सफल करावा, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे . '
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा