ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहिर


अकोला,दि.5(जिमाका)- माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणुका- 2020 करीता प्रभाग रचना व आरक्षण  कार्यक्रम  राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. राज्य निवडणुक  आयोगाने नेमून नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी कार्यक्रम पुढील प्रमाणे.         
तहसिलदार यांनी गुगलमॅप वर MRSAC चे नकाशे super impose करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे परिच्छेद ५.१ (अ)) कार्यवाही पूर्ण करण्याचाअंतिम दिनांक शुक्रवार २० डिसेंबर , संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे परिच्छेद ५.१(ब) कार्यवाही पूर्ण करण्याचाअंतिम दिनांक सोमवार ३० डिसेंबर  , तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे व सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करणे  कार्यवाही पूर्ण करण्याचाअंतिम दिनांक, शुक्रवार १० जानेवारी २०२०, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नमुना-ब(प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण)प्रसिध्द करण्यापूर्वी तहसिल कार्यालयाकडून असे प्रस्ताव प्राप्त करुन त्याची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करणे,  कार्यवाही पूर्ण करण्याचाअंतिम दिनांक सोमवार २० जानेवारी २०२०, या दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसह) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी. गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२०, विशेष ग्रामसभेची सूचना देणे ( आरक्षणाची सोडत काढण्याकरीता) शनिवार दिनांक ०१ फेब्रूवारी २०२०, विशेष प्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसह) काढणे मंगळवार दिनांक ०४ फेब्रूवारी २०२०.
प्रारुप प्रभाग रचनेला(नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देऊन तहसिलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार ०७ फेब्रूवारी २०२०, प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार १४ फेब्रूवारी २०२०, प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे गुरुवार दिनांक २० फेब्रूवारी २०२०, प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे शनिवार दिनांक २२ फेब्रूवारी २०२०, आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे दिनांक बुधवार ११मार्च २०२०.
उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे मंगळवार दिनांक १७ मार्च २०२०, जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अमध्ये) व्यापक प्रसिध्दी देणे शनिवार दिनांक २१ मार्च २०२० असा आहे. 
00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ