भेसळयुक्त,बनावट व अवैध मद्यविक्री ची तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक


अकोला,दि.24(जिमाका)-  वर्षाअखेर (३१ डिसेंबर) निमित्त होणारी संभाव्य मद्यविक्री व उलाढाल पाहता भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांकावर थेट तक्रार नोंदविता येणार आहे. बनावट,अवैध मद्य विक्रीबाबत कुणाला काहीही माहिती असल्यास , तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  18008333333 हा टोल फ्री क्रमांक आणि 8422001133 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्याबअकोला जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ यांनी केले आहे.
                                                          00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ