सहकारी संस्थांचे निवडणुक निर्णय अधिकारी यांची नामतालिका साठी अर्ज आमंत्रीत
अकोला,दि.7 (जिमाका)- मा.सचिव,राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची
निवडणूक) नियम 2014 अन्वये क व ड वर्गातील सहकारी संस्थांचे निवडणुकीकरिता निवडणुक निर्णय अधिकारी यांचे 1 जानेवारी 2020
ते 31 डिसेंबर 22 या कालावधीसाठी पॅनेल (नामतालिका)तयार करण्यासाठी जिल्हयातील पात्र व्यक्तींनी या नाम
तालिकेत नावे समाविष्ट करण्याकरिता दिनांक 7
ते 21 डिसेंबर 2019 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज व स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे.असे
आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रविण एच.लोखंडे यांनी केले आहे.
त्यात शासनाचे इतर शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य
संस्थेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी वरिष्ठ लिपिक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या
कर्मचारी यांचा समावेश होऊ शकतो, प्रमाणित
लेखापरीक्षक हा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या नामतालिकेवरील नोंदणीकृत व कार्यरत प्रमाणित
लेखापरीक्षक असावा , वकील असल्यास वकीलाची सनद प्राप्त
झाल्यापासून प्रत्यक्षात किमान 5 वर्षे कामकाज केल्याचा अनुभव, कोणत्याही शासकीय विभागातून किंवा
स्थानिक स्वराज्य संस्थेतुन सेवानिवृत्त झालेले /सहकारी
संस्थामधुन म्हणून सेवानिवृत्त झालेले अधिकारी /कर्मचारी
वरिष्ठ लिपिक व त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या सेवानिवृत्त् अधिकारी/ कर्मचारी.सर्वसाधारणपणे वय वर्षे 65 पेक्षा जादा नसावे, सहकारी संस्थेतील वरिष्ठ लिपिक व त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या
अधिकारी/ कर्मचारी म्हणुन 5 वर्षे सेवा केलेली असावी, नामतालिकेत समाविष्ट करावयाचा उमेदवार हा किमान पदवीधर असणे
अनिवार्य आहे.
नमुन्यातील अर्जासह
आवश्यक तो स्वाक्षांकीत छायाकिंत पुरावे परिपुर्ण भरुन
जोडणे अनिवार्य राहील , समाविष्ट होऊ इच्छितो त्या
जिल्ह्यातील नियमित रहिवासी असावा व त्या जिल्ह्यातील रहिवासी असल्याबाबत त्याने
अर्जासोबत आधार कार्ड ,पॅन कार्ड ,रेशन कार्ड , मतदार ओळखपत्र इत्यादी पैकी
एक पुरावा साक्षांकित करून सादर करणे अनिवार्य राहील. उमेदवाराने एका जिल्हा
सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अधिका-याकडे अर्ज सादर करू नये तसेच
विहित नमुन्यात रू.100 स्टॅप पेपर वर प्रतिज्ञापत्र देणे
आवश्यक राहील, याबाबत नमुन्यातील अर्ज सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे
यांचे https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आला आहे. त्वरीत आपले नामतालिकेत नाव समाविष्ट
करण्यासाठी मुळ
अर्ज व एक छायाकिंत प्रतीसह आवश्यक कागदपत्रासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, आदर्श कॉलनी ,सहकार संकुल ,अकोला येथे कार्यालयीन वेळेत
सादर करावा असे
सहकारी संस्थाचे जिल्हा
उपनिबंधक डॉ.प्रविण एच.लोखंडे यांनी कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा