खाजगी वाहनातून होणारी विदयार्थी वाहतुक ; कार्यवाहीसाठी विशेष तपासणी मोहिम



अकोला,दि.7 (जिमाका)-  अनधिकृत स्कूल व्हॅन, बसेसवर व ऑटोरिक्षा तसेच खाजगी वाहनातून होणारी विदयार्थी वाहतक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
सर्व वाहनधारक व वाहनचालक यांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की, शालेय विदयाथ्यांची अनधिकृत स्कूल व्हॅनद्वारे वाहतुक होत असल्याने स्कूल बस वाहतुक नियमावलीचे अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष मोहीम दरम्यात विदयार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मोटार सायकलची तपासणी करण्यात येत असुन
यावेळी  आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत असल्यास अथवा चालक तसेच सहप्रवाशी/विदयार्थी यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे निदर्शनास आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल.
 ऑटोरिक्षानी मीटरप्रमाणे भाडे आकारणे.शेअर रिक्षा मार्गावर अथवा प्रिपेड मार्गावर मंजुर भाडे आकारणे
आवश्यक आहे.शालेय विदयार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात आली नाही.तसेच शालेय विदयार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या खाजगी वाहनांविरुध्द,शालेय विदयार्थ्यांची कंत्राटी पध्दतीने वाहतुक करणाऱ्याऑटोरिक्षाविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल.
 तसेच शालेय विदयार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या सर्वच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.
विहीत परवान्याशिवाय विदयार्थी वाहतुक करणाऱ्या सर्वच वाहनांविरुध्द कडक कार्यवाही येईल.आसनक्षमतेपेक्षा जादा विदयार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांविरुध्द कडक कार्यवाही येईल.स्कुलबस नियमावलीतील तरतुदीचा भंग करुन चालणाऱ्या परवानाधारक स्कुल व्हॅन/बसेस वर कडक कार्यवाही येईल.
उच्च न्यायालयाने ऑटोरिक्षामधून विदयाथ्यांची वाहतुक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांनाअॅटोरिक्षामधुन प्रवास करण्यास मनाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.तसेच पालक व शाळा यांना अॅटोरिक्षा मधुन विदयार्थी वाहतुक न करण्याबाबत सक्त सुचना देऊन नंतर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.समाज सेवक तसेच सेवाभावी व्यक्ती यांनी राज्य शासनास सुरक्षाविषयक तरतुदी असलेल्या बसेस/वाहने माफक दरात विदयार्थी वाहतुकीसाठी पुरविण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.शाळांनी सामाजिक संस्था व समाजसेवी व्यक्ती यांचे सहकार्य घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले