फिट इंडिया चळवळ:शालेयस्तरावर होणार शारिरीक क्षमतांचे मूल्यमापन
फिट इंडिया चळवळ
शालेयस्तरावर होणार शारिरीक क्षमतांचे
मूल्यमापन
जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकाऱ्यांचे
निर्देश
अकोला,दि.४(जिमाका)-महाराष्ट्र राज्यात क्रीडा सांस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे या दि.१२ ते १८ डिसेंबर या कालावधीत दरवर्षी क्रीडा सप्ताह आयोजीत केला जातो. यानिमित्ताने फिट इंडीया चळवळीचा भाग म्हणून
शाळास्तरावर शालेय विद्यार्थ्यांच्या शारिरीक क्षमतांची चाचणी करुन त्याचा
मूल्यमापन अहवाल संकेतस्थळावर भरण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व
शाळांनी सहभागी व्हावे असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी आज
दिले.
या
संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत, ग.वु.सावरकर, दिनेश दुतोंडे, अनिल आकाड, रतनसिंह पवार, कैलास सोंळके, एन.बी.सरोदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे प्रतिनिधी बीरमवार, महानगरपालीका विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल बिडवे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, तालुका क्रीडा संयोजक गजेंद्र काळे, शांतीकुमार सावरकर, राजेश मोरे, दिपक तायडे, शरद हिंगणकर, प्रदिप थोरात, राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव, सतिषचंद्र भट, क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, चारुदत्त नाकट, क्रीडा विभागाचे कर्मचारी राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे आदी उपस्थित होते.
फिट इंडिया चळवळ अंतर्गत क्रीडा सप्ताहा दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक,शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालीका, खाजगी अनुदानीत व
विनाअनुदानीत शाळा, स्वयंअर्थसहाय्यीत
शाळा येथे
विद्यार्थ्यांच्या शारिरीक क्षमता मुल्यमापन करुन मूल्यमापन अहवाल हा https:schoolfitness.kheloindia.gov.in
या संकेतस्थळावर भरण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा
कार्यक्रम राबविण्यासाठी गट शिक्षणाधिकारी
व तालुका क्रीडा संयोजक यांनी संयुक्त कार्यवाही
करावी,असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी आज येथे दिले.
या बैठकीत
फिट इंडिया मुव्हमेंट बाबत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनव्दारे
जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी उपस्थितांना
माहिती दिली. या उपक्रमात
वयोगट ५ ते ८ वर्ष या करीता १)बीएमआय २)प्लेट टॅपिंग
टेस्ट ३)फ्लॅमिंगो बॅलेंस
टेस्ट
वयोगट ९ ते १८ वर्ष १)बीएमआय २)अब्डोमिनल पार्टीकल कर्ल अप ३) फ्लेक्झीबीलीटी-सिट ऍ़ण्ड रिच
टेस्ट, ४) ६०० मिटर धावणे ५)स्पीड-५० मी. डॅश धावणे इत्यादी शारिरीक क्षमता मूल्यमापन चाचण्या
या शाळास्तरावर घेवून खेळाडूंचे मुल्यमापन विषयक माहिती संकेत स्थळावर ‘खेलो इंडिया’ मोबाईल ॲपव्दारे भरण्यात
यावी. फिट इंडिया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शाळांसाठी मानाकंन पद्धत तयार करण्यात आली आहे. पद्धत शाळांनी
प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्रीय भाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा