महागणेशोत्सव कार्यक्रमातून मंगलमय सुरांची बरसात
महागणेशोत्सव कार्यक्रमातून मंगलमय सुरांची बरसात अकोला, दि. 22 : सांस्कृतिक कार्य संचालनालय व अकोला जिल्हा प्रशासनातर्फे गणेशोत्सवानिमित्त महागणेशोत्सव कार्यक्रम पोलीस लॉन येथे झाला. या कार्यक्रमातून सुमधूर गाणी, प्रार्थना व भक्ती रचनांनी कार्यक्रमात मंगलमय सुरांची बरसात झाली. ताकदीच्या गायक कलावंतांनी अनेक उत्तमोत्तम गाणी व भक्ती रचना सादर केल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यम शिवम सुंदरम देवाश्री गणेशा अशा भक्ती गीतांनी श्रोते भक्ती रसात न्हाऊन निघाले.निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, तहसिलदार कृणाल झाल्टे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मसकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि गायक राम देशपांडे हे तर गायक मदन खुणे,गायिका कविता वरघट, कु.भूमिका राऊत होते. मनोज राऊत कीबोर्ड प्लेयर, प्रशांत इंगळे तबला वादक, यश कदम ऑक्टोपॅड वादक, प्रदीप रंगारी- ढोल वादक, छोटू वाघमारे ढोलकी वादक, सचिन जाधव गिटार वादक होते. विविध नृत्य सादर करण्यात आली.सूत्रसंचलन पल्लवी डोंगरे यांनी केले