‘सीसीआय’च्या कापूस खरेदीसाठी १५ मार्चपूर्वी नोंदणी आवश्यक कापूस उत्पादकांनी आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे

 

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीसाठी १५ मार्चपूर्वी नोंदणी आवश्यक

कापूस उत्पादकांनी आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा

-        जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे

अकोला, दि. ११ : भारतीय कापूस निगमकडून (सीसीआय) चालू कापूस हंगामात किमान हमी दराने कापूस खरेदी करण्यासाठी नोंदणीची तारीख १५ मार्च आहे. जिल्ह्यात ११ केंद्रावर नोंदणी सुरू असून, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

चालू कापूस हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमतअंतर्गत कापसासाठी आगाऊ किंवा जागेवर नोंदणी केलेल्या शेतक-यांकडून कापूस खरेदी सुरू आहे. दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी चालू कापूस हंगाम संपत असून, किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १५ मार्चपूर्वी नोंदणी आवश्यक आहे. तशी नोंद न केल्यास संबंधित हमी दराने सीसीआयला कापूस विक्रीसाठी पात्र नसतील, असे सीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

        जिल्ह्यात बोरगाव मंजू, कापशी, निंबी, अकोट, चोहोट्टा बाजार, तेल्हारा, हिवरखेड, पारस, बार्शिटाकळी, महान व मूर्तिजापूर येथील ११ केंद्रावर नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी नोंदणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम