मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या कालावधीत वाढ
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या कालावधीत वाढ
अकोला, दि. १८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागातर्फे
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन
रोजगारक्षम केले जाते. या योजनेचा कालावधी आता ६ महिन्यांहून ११ महिन्यांपर्यंत वाढविण्यात
आला आहे, असे सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.
ज्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी १० मार्चपूर्वी पूर्ण झाला अशा
उमेदवारांना पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रूजू होता येईल.
अशा प्रशिक्षणार्थींनी आस्थापनेशी संपर्क साधून दि. ३० एप्रिलपूर्वी रूजू व्हावे. संबंधित
कार्यालये व आस्थापनांनी याबाबत ऑनलाईन पोर्टलवरील कार्यवाहीची पूर्तता करावी. प्रशिक्षणार्थ्यांनी
पुन्हा रूजू होण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य
विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. शेळके यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा