ग्रा. पं. सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

  

ग्रा. पं. सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

अकोला, दि. १९ : अकोला जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच विविध ग्रामपंचायतींतील १२५ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.    

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक, तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणा-या मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, प्रभागनिहाय यादीवर आक्षेप व हरकती घेण्याची मुदत दि. १९ ते २४ मार्च आहे. आक्षेप व हरकती तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी दि. २६ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्र. ग्रा. पं. निवडणूक उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिली.

 

तेल्हारा तालुक्यातील २, अकोट तालुक्यातील २, मूर्तिजापूर तालुक्यातील ४, अकोला तालुक्यातील ३, बाळापूर तालुक्यातील २, बार्शिटाकळी तालुक्यातील २, पातूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होईल. त्याचप्रमाणे, १० थेट सरपंच रिक्त पदांसह एकूण १२५ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यात तेल्हारा तालुक्यातील ११, अकोट तालुक्यातील २६ (४ थेट सरपंच रिक्त), मूर्तिजापूर तालुक्यातील १२ (१सरपंच रिक्त), अकोला तालुक्यातील ३० (३ सरपंच रिक्त पदे), बाळापूर तालुक्यातील १४, बार्शिटाकळी तालुक्यातील २० (१ सरपंचपद रिक्त), पातूर तालुक्यातील १२ (१ सरपंचपद रिक्त) आदी पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम