अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अकोला, दि. ११ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित
जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात
येते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी
केले आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ ‘महाराष्ट्र.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर
ताज्या घडामोडींमध्ये या उपक्रमाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्जाची प्रत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय,
३, चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करावा. अर्ज दि. ३० एप्रिलपूर्वी सादर करणे आवश्यक
आहे.
विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील व महाराष्ट्राचा रहिवासी
असावा. परदेशातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांत पूर्णवेळ प्रवेशित असावा. विहित कालावधीत
अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी
४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. विद्यार्थ्यांचे कौटुंबिक एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा
जास्त नसावे. शिष्यवृत्तीत शैक्षणिक कालावधीपासून लागू शिक्षण फी, परतीच्या प्रवासासह
विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा आदी खर्च मंजूर करण्यात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा