विशेष शिबिराद्वारे २५० जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण

 

विशेष शिबिराद्वारे २५० जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण

अकोला, दि. २१ : जिल्हा जात पडताळणी समितीतर्फे १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित विशेष शिबिरात एकूण २५० जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील समितीच्या कार्यालयात गुरूवारी (२० मार्च) शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्रुटीमुळे प्रलंबित असलेले अर्ज पूर्ततेनंतर निकाली काढण्यात आले, तसेच नविन अर्जही मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले. सुनावणीद्वारे जातीविषयक पुरावे, कागदपत्रे पूर्तता करून घेण्यात आली. 

शिबिरात एकूण २०० विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र, तसेच ५० सेवाविषयक प्रकरणांमध्ये समितीमार्फत निर्णय ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आले. अशी एकूण २५० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी स्वत: शिबिराला उपस्थित राहून अभ्यागतांच्या समस्यांचे निवारण केले. इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी शिबिर आयोजिण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी समितीच्या कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम