राष्ट्रीय कार्यक्रमात जि. प. आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर

 

राष्ट्रीय कार्यक्रमात जि. प. आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर

 

अकोला, दि. ४ : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गुणानुक्रम ठरविण्यात येतो. त्यात अकोल्याचा जि. प. आरोग्य विभाग गतवर्षी ७ वेळा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.  

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकानुसार डिसेंबर 2024 चे गुणानुक्रम राज्य स्तरावरून काढण्यात आले. त्यात अकोला जि. प. आरोग्य विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्याने एप्रिल ते डिसेंबर 2024 या ९ महिन्याच्या कालावधीत तब्बल सातवेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

         राष्ट्रीय कार्यक्रमात महत्त्वाच्या काही आरोग्य निर्देशांकाद्वारे संपूर्ण राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्यचिकित्सक , महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कामाचे राष्ट्रीय कार्यक्रमातर्गत लसीकरण, माता बाल संगोपन, आरसीएच पोर्टल ,आयडीएसपी, एनसीडी ,कुटुंब कल्याण कार्यक्रम ,क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम इत्यादी महत्त्वाचे निर्देशांकाचे गुणानुक्रम राज्यस्तरावरून काढण्यात आले.  

         मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व उपसंचालक आरोग्य डॉ. कमलेश भंडारी मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि त्यांचे सहकारी यांनी

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले. विभागाकडून नियमित आढावा, पाठपुरावा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामात सुधारणा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांवर पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार आरोग्य सेवक, सेविका यांच्या कामात सुधारणा आदी कामे साध्य झाली.  कार्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत पवार, माता वाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी ,सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचा सहभाग आहे.

०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम