अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दौरा
अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दौरा
अकोला, दि. २८ : राज्य अनुसूचित
जाती जमातीचे उपाध्यक्ष (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम दि.३ एप्रिल रोजी अकोला जिल्हा
दौ-यावर आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी अकोला येथे
शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, दि. ३ एप्रिल रोजी स. ११ वा. अकोला महापालिका
आयुक्तांसमवेत अनुसूचित जाती जमाती निधीतील कामांचा बैठकीद्वारे आढावा व पाहणी, दु.
१२ वा. अकोट नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक, दु. १ वा. तेल्हारा
नगरपालिका मुख्याधिका-यांसमवेत आढावा बैठक, दु. २ ते २.३० वा. राखीव.
दु. २.३० ते ३.३० दरम्यान बाळापूर नगरपालिका मुख्याधिका-यांसमवेत आढावा
बैठक, दु. ३.३० वा. बार्शिटाकळी नगरपालिका मुख्याधिका-यांसमवेत आढावा बैठक, दु. ४.३०
वा. मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिका-यांसमवेत आढावा बैठक, दु. ५.३० वा. पातूर नगरपालिका
मुख्याधिका-यांसमवेत आढावा बैठक. त्यानंतर सोयीनुसार अकोला येथून मुंबईकडे रवाना.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा