स्वयंसहायित शाळांना हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन
स्वयंसहायित शाळांना
हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन
अकोला, दि. ५ : महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित
शाळा अधिनियमांतर्गत नविन शाळा व दर्जावाढीसाठी प्राप्त ९ प्रस्तावांपैकी ४ शाळांचे प्रस्ताव शिफारशीसह
शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ५ शाळांच्या प्रस्तावात त्रुटी
आढळून आल्या आहेत. शिफारसप्राप्त शाळांबाबत हरकती व सूचना असल्यास १५ दिवसांच्या
आत नोंदविण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले आहे.
बाळापूर तालुक्यातील उरळ येथील श्री शिवशंकर पब्लिक
स्कूल, मूर्तिजापूर येथील मूर्तिजापूर पब्लिक स्कूल, पातूर तालुक्यातील खानापूर
येथील महादेव व्ही. ढोकणे प्राथमिक इंग्रजी शाळा, बाळापूर तालुक्यातील निंबी येथील
बाल शिवाजी कॉन्व्हेंट यांचे प्रस्ताव शिफारशीसह शासनाकडे पाठविण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे, सोनोरी (मूर्तिजापूर) येथील अल
रोशनी इंग्रजी शाळा, तेल्हारा येथील श्रीमती पार्वतीबाई तापडिया कॉन्व्हेंट, शिवणी
येथील ब्लू लोटस प्राथमिक शाळा, अकोला येथील नूतन कॉन्व्हेंट व भारत विद्यालय आदी
शाळांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबतची यादी शासनाच्या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याबाबत आक्षेप- हरकती असल्यास १५ दिवसांत सादर
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
जय श्री राम
उत्तर द्याहटवा