जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी





जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अकोला, दि. १२ : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आज साजरी करण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अधिक्षक शाम धनमाने, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

स्व. चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घातला. ते महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारे खंबीर नेतृत्व होते. पंचायत राज्याच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान दिले, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी अभिवादन केले.

 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम