शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढा महाविद्यालयांना ‘समाजकल्याण’ची सूचना
शिष्यवृत्तीचे प्रलंबित
अर्ज निकाली काढा
महाविद्यालयांना ‘समाजकल्याण’ची
सूचना
अकोला, दि. ४ : अनुसूचित
जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून,
ते महाविद्यालयांनी तातडीने निकाली काढावे, अशी सूचना समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ.
अनिता राठोड यांनी केली आहे.
शिष्यवृत्तीसाठी १२ हजार
६५१ अर्ज नोंदणीकृत असून, विद्यार्थी स्तरावर ६९८, महाविद्यालय स्तरावर २ हजार ५४१ अर्ज प्रलंबित असल्याची नोंद आहे. प्रलंबित
अर्जांच्या क्रमवारीत पहिल्या दहा महाविद्यालयांत गाडेगाव येथील डॉ. गोपाळराव खेडकर
महाविद्यालय (प्रलंबित अर्ज २७७), अकोला येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय
(१०३), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (८७) , इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (८२),
उगवा येथील नालंदा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (६३), श्री शिवाजी कला, वाणिज्य
व विज्ञान महाविद्यालय (६१), ब्रम्ही येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय (५७),
सीताबाई महाविद्यालय (५३), स्व. शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालय (४६) व बाभूळगाव
येथील श्री संत गजानन महाराज महाविद्यालय (४३) यांचा समावेश आहे.
चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अत्यंत कमी कालावधी
राहिला असून, ऑनलाईन अर्जांबाबतची पूर्तता सर्व महाविद्यालयांनी करून घ्यावी आणि कुठलाही
पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सहायक
आयुक्तांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा