बालविवाह थांबविण्यात ‘ॲक्सेस टु जस्टीस’ला यश

 

बालविवाह थांबविण्यात ‘ॲक्सेस टु जस्टीस’ला यश 

अकोला, दि. २६ : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होऊ घातलेला बालविवाह वेळीच रोखण्यात ‘ॲक्सेस टु जस्टिस’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. 

चान्नीलगतच्या गावात बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच ‘ॲक्सेस टु जस्टिस’ प्रकल्प, आयएसडब्ल्यूएस पथकाने बालिकेच्या घरी भेट दिली. मुलीचे वडील 4 वर्षांपूर्वी मरण पावले असून आईने दुसरे लग्न केल्याने पालनपोषण आजी करत होती. आजीने तशी माहिती पथकाला दिली. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने, तसेच आजीला दुस-या कुणाचा आधार नसल्याने मुलीचे लग्न करण्याचा विचार केला होता, असे आजींनी पथकाला सांगितले. त्यावेळी पथकाच्या सदस्यांनी आजींची समजूत काढली व बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहीती दिली. मुलीचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही, असे सांगितले व मुलीला बालकल्याण समितीसमक्ष सादर करण्यात आले.

बालकल्याण समितीने मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस यांची साक्ष घेण्यात आली. हा बालविवाह थांबविण्यासाठी बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले, संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये, कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी मोलाचे कार्य केले.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम