अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आता अधिक सुलभ ‘मेरा केवायसी’ ॲप्लिकेशन उपलब्ध जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांची माहिती
अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
ई-केवायसी आता अधिक सुलभ
‘मेरा केवायसी’ ॲप्लिकेशन उपलब्ध
जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांची माहिती
अकोला, दि. १२ :
राष्ट्रीय
अन्नसुरक्षा योजनेत शिधापत्रिकाधारकांना ई- केवायसी पूर्ण करणे बंधनकारक असून, ती दि.
३१ मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावी. त्यासाठी आता ‘मेरा केवायसी’ हे ॲपही उपलब्ध करून
देण्यात आले असून, प्रक्रिया सोपी-सुलभ झाली आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी
निखिल खेमनार यांनी केले आहे.
गरजूंना धान्याचा लाभ सुरळीत सुरू राहावा यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारक
प्रत्येक लाभार्थ्याची ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा
योजनेत लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांमध्ये जाऊन ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया
प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात यावी, लाभार्थ्यांना घरबसल्या आता ई- केवायसी करता येणार
आहे. लाभार्थी दुकानात न जाता स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करू शकतील.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे.
ही प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय
अन्नसुरक्षा योजनेत ज्या लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांमध्ये जाऊन ई- केवायसी प्रक्रिया
पूर्ण केली नसेल त्यांनी ॲपचा वापर करावा, असे आवाहन श्री. खेमनार यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा