शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्जांबाबत तत्काळ पूर्तता करा - समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन

 

 

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्जांबाबत तत्काळ पूर्तता करा

-        समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन

अकोला, दि. १८ : सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांचे बरेच अर्ज अद्यापही विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून, त्याची तत्काळ पूर्तता करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.   

 

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी,परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहेत.

 चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी अत्यंत कमी कालावधी राहिला असून, महाडीबीटीच्या डॅशबोर्डवर २०२४-२५ या वर्षात महाविद्यालय स्तरावर १ हजार ८९७, तसेच विद्यार्थी स्तरावर ८३७ अर्ज प्रलंबित आहेत. सन २०२३-२४ या वर्षातील महाविद्यालय स्तरावर २९६ व विद्यार्थी स्तरावर ७९३, सन २०२२-२३ या वर्षात महाविद्यालय स्तरावर १३९ व विद्यार्थ्यांकडे ७३७ अर्ज प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे, सन २०२१-२२ या वर्षात महाविद्यालय स्तरावर १३६ व विद्यार्थीस्तरावर ३७२ अर्ज प्रलंबित आहेत.   

यापूर्वी कार्यालयाकडून महाविद्यालयांना कळवूनही अर्ज प्रलंबित असणे ही बाब गंभीर आहे. महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची तपासणी व पडताळणी करून तसेच अर्जाची त्रुटींची पूर्तता करावी. नोंदणीकृत सर्व प्रलंबित अर्जांची पडताळणी करून अंतिम मंजुरीसाठी कार्यालयाच्या लॉगइनवर पाठवावे जेणेकरून पुढील कार्यवाही होऊ शकेल, असे आवाहन श्रीमती राठोड यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम