वॉकेथॉन’द्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश जागतिक महिलादिनानिमित्त महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

 


















वॉकेथॉन’द्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

जागतिक महिलादिनानिमित्त

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम


अकोला, दि. ७ : महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रम, तसेच जागतिक महिला दिनानिमित्त शहरात ‘वॉकेथॉन’द्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचा शुभारंभ केला.

विविध मान्यवर व महिलाभगिनी, तसेच नागरिकांच्या सहभागासह जिल्हा परिषदेपासून ते हुतात्मा स्मारकापर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बी.वैष्णवी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर, महिला व बालकल्याण अधिकारी राजश्री कौलखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा आहे. कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे सांभाळून महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी दिले. श्रीमती वैष्णवी यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘वॉकेथॉन’मध्ये महिला हक्क, सुरक्षितता याबाबत जाणीवजागृती करण्यात आली. यात्रेच्या अग्र बाजूला दुचाकीवर स्वार दामिनी पथक, त्यामागे सुशोभित महिला सक्षमीकरण रथ, विविध फलक घेऊन सहभागी अंगणवाडी ताईंसह अनेक क्षेत्रांतील महिलाभगिनी, फेटे बांधून सहभागी अनेक मान्यवर, मार्गावर ठिकठिकाणी थांबून घोषणांद्वारे जनजागृती असे या यात्रेचे स्वरूप होते. हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली.

०००




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम