शिधापत्रिकेसंबंधी कोणतेही कामकाज त्रयस्थामार्फत करू नका अन्नधान्य वितरण अधिका-यांचे आवाहन
शिधापत्रिकेसंबंधी कोणतेही कामकाज त्रयस्थामार्फत करू नका
अन्नधान्य वितरण अधिका-यांचे आवाहन
अकोला, दि. २१ : शिधापत्रिकेसंबंधी कोणतेही कामकाज कोणत्याही एजंट किंवा
त्रयस्थ व्यक्तीमार्फत करू नये, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी रवींद्र यन्नावार
यांनी केले आहे.
शिधापत्रिकेसंबंधी अर्ज कार्डधारकांकडून शासनाच्या आरसीएमएस पोर्टलवर
पब्लिक लॉगइनद्वारे स्वत: किंवा कार्यालयात सकाळी १० ते २ या वेळेत प्रत्यक्ष हजर राहून
सादर केली जातात. शहर पुरवठा कार्यालयामार्फत त्यासंबंधी नियमानुसार पुढील प्रक्रिया
केली जाते. त्यामुळे कुणीही एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीमार्फत शिधापत्रिकेसंबंधी कामकाज
करू नये. फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.
शिधापत्रिकेच्या कामकाजासाठी केवळ कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी
संपर्क साधावा. ई-शिधापत्रिकांसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या
कागदपत्रांसह कार्यालयात स्वत: येऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा