स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत १५ मार्चपर्यंत

 

 

 

 

स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत १५ मार्चपर्यंत

 

अकोला, दि. ५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सन 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज http://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. १५ मार्चपर्यंत भरता येतील. विद्यार्थ्यांनी मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित होते.

        त्यामुळे या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज व आवश्यक कागदपत्रे तसेच आधार लिंक व केवायसी पूर्ण करण्यात आलेल्या अद्ययावत बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत सबमिट करून त्याची तसेच  सर्व कागदपत्रांची प्रिंट (हार्ड कॉपी ) सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करावीत. असे आवाहन डॉ. अनिता राठोड सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण अकोला यांनी केले आहे. समाजकल्याण कार्यालयाचा पत्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी पोलीस वसाहत जवळ, दक्षतानगर, अकोला असा आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम