जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा ग्राहक हक्क व संरक्षणाविषयी सजगता वाढवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार





जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

 

ग्राहक हक्क व संरक्षणाविषयी सजगता वाढवा

 

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

 

अकोला, दि. १८ : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येकाला  ग्राहक म्हणून सुरक्षेचा, माहितीचा, म्हणणे मांडण्याचा, निवड करण्याचा हक्क आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून उत्कृष्ट सेवा पुरविणे हे आस्थापनेचे कर्तव्य आहे. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे,अकोला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सचिव नीलिमा बेलोकर, ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष श्रीराम ठोसर , ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मनजीत देशमुख, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे संजय पाठक, पुरवठा अधिकारी रवींद्र येंनावर यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध  ग्राहक सेवा एका क्लिकवर आल्या असून ग्राहकांना कालबद्ध सेवा पुरवणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्राहक दूत यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोककलावंत खंडोजी शिरसाट यांनी शाहिरीतून ग्राहक संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना उस्केल यांनी केले.

000


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम