अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने कुठल्याही आमिषाला बळी पडू नका – महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे
अंगणवाडी सेविका, मदतनीस
भरती पारदर्शक पद्धतीने
कुठल्याही आमिषाला बळी
पडू नका
– महिला व बालविकास अधिकारी
राजश्री कोलखेडे
अकोला, दि. ३ : जिल्हा
परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातर्फे
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांची १६८ पदे भरण्यात येत आहेत.
भरती प्रक्रिया अत्यंत
पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये
व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे आवाहन जि. प. महिला व बालविकास अधिकारी
राजश्री कोलखेडे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा