अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा प्रत्येक गरजूला योजनेचा लाभ मिळवून द्यावा - ललित गांधी
अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा
प्रत्येक गरजूला योजनेचा लाभ मिळवून द्यावा
- ललित गांधी
अकोला, दि. 24 : शासनाच्या, तसेच महामंडळाच्या योजनांचा लाभ प्रत्येक
गरजूला मिळवून द्यावा, असे निर्देश जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष
ललित गांधी यांनी आज येथे दिले.
महामंडळाच्या व इतर शासकीय योजनांचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत
होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त
डॉ. सुनील लहाने, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर
आदी उपस्थित होते
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी
राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करते. त्याचबरोबर, अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी
स्वतंत्र वसतिगृह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कार्यान्वित आहे. या वसतिगृहामध्ये
प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना प्रोत्साहित करावे, असे श्री. गांधी यांनी
यावेळी सांगितले.
जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिरपूर जैन येथे देशभरातील भाविक
अकोलामार्गे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अकोला शहरात जैनभवन निर्माण करण्याबाबत
प्रयत्न होणे गरजेचे असून अकोला ते शिरपूर जैन बस फेऱ्या वाढविण्याबाबत परिवहन महामंडळाकडे
पाठपुरावा करण्याचे निर्देशही श्री. गांधी यांनी यावेळी दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा